पाकिस्तानशी अखंड संवाद ठेवण्याचा काळ संपला, यापुढे नरमाईची भूमिका नाही; केंद्र सरकारचा इशारा

jayshankar

पाकिस्तानशी अखंडपणे संवाद सुरु ठेवण्याचा काळ आता संपला असून पाकिस्तानबाबत कोणतीही नरमाईची भूमिका घेतली जाणार नाही, असा इशारा केंद्र सरकारने आज पाकिस्तानला दिला. कोणत्याही पृतीचे परिणाम असतातच. जम्मू-कश्मीरचा मुद्दा असेल, तर आता कलम 370 हटवण्यात आले आहे. त्यामुळे  पाकिस्तानशी कोणत्या प्रकारचे संबंध यापुढे कायम ठेवायचे असा प्रश्न आहे, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी हिंदुस्थानची भूमिका मांडली.

त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन देशांमधील घडामोडी आणि हिंदुस्थानातील दहशतवादी कारवाया यासंदर्भात भाष्य केले. पाकिस्तानशी अव्याहतपणे संवाद ठेवण्याचा काळ आता संपला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, पाकिस्ताकडून होणाऱया कोणत्याही प्रकारच्या कारवाईला हिंदुस्थान उत्तर देईल. हिंदुस्थानची पृती आता इतरांवर अवलंबून नसेल.  हिंदुस्थान उत्तर देणार, असे जयशंकर म्हणाले.