सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा, ‘आयसीएमआर’कडून ऍडव्हायजरी जारी

देशात पुन्हा एकदा एन्फ्लूएंझा सब टाईप एच3एन2 आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ‘एमसीआयआर’ने एक संयुक्त ऍडव्हायजरी जारी करत या सार्वजनिक आरोग्य उपायांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये गर्दीच्या आणि कोंदट ठिकाणी मास्कचा वापर, गर्दी टाळावी, शिंकताना अथवा खोकताना रुमालाचा वापर, हाताची स्वच्छता राखावी, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे असे नमूद करण्यात आले आहे.