गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी झालीच नाही, केंद्रीय मंत्र्यांचं ट्वीट डीलिट

923
amit-shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचं वृत्त आहे. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी शहा यांची चाचणी निगेटिव्ह आल्याचं म्हटलं होतं. मात्र, अधिकृत पातळीवर याची कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, खासदार मनोज तिवारी यांनी ट्वीट करून अमित शहा हे कोरोनामुक्त झाल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यावर गृहमंत्रालयाने कोणताही खुलासा केलेला नाही. तसंच अद्याप अमित शहा यांची नव्याने कोरोना चाचणी झालीच नसल्याचं एएनआयने गृहमंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. तसंच मनोज तिवारी यांनीही आपलं ट्वीट डीलिट केल्याचं वृत्त आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं वृत्त 2 ऑगस्ट रोजी प्रसारित झालं होतं. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. शहा यांना उपचारासाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे एम्समधील काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, पण डिस्चार्ज नाही

‘कोरोनाची सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली होती, याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात उपचारासाठी भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करावी आणि स्वतःला आयसोलेट करावे’, असे ट्विट अमित शहा यांनी केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या