आमच्या राज्याला काहीच मिळालं नाही! अर्थसंकल्पावर केंद्रीय मंत्रीच नाराज

2140

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नियमितपणे कर भरणारे, पगारदार वर्गाला एका पैशाचाही लाभ न मिळाल्यानं २०१८ सालच्या अर्थसंकल्पाबाबत मध्यमवर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. विरोधक या अर्थसंकल्पावर टीका करतातच आहे, आता केंद्रीय मंत्र्यानेही या अर्थसंल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय विज्ञान आणि उद्योग राज्यमंत्री वाय.एस.चौधरी यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे की या अर्थसंकल्पातून आंध्र प्रदेशला काहीच मिळालं नाही. ” रेल्वे झोन तयार करणे, पोलावरम प्रकल्पासाठी निधी, अमरावतीसाठी निधी यासारख्या अनेक प्रलंबित मुद्यांवर मागणी करूनही काही मिळालं नाहीये” असं चौधरी यांचं म्हणणं आहे

चौधरी हे भाजपचा मित्र पक्ष असलेल्या तेलगू देसम पक्षाचे खासदार आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी भाजपवर मित्रधर्म पाळत नसल्याबद्दल कडाडून हल्ला चढवला होता. चौधरी यांच्या नाराजीबाबत नायडू यांना विचारलं असता ते म्हणाले की जेव्हा भाजप आमच्यासोबतची मैत्री तोडेल तेव्हाच ते याबाबत बोलतील, भाजपसोबतच्या मैत्रीमुळे आपण सध्या काही बोलत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री यनमाला राम कृष्णाडू यांनीही चौधरी यांच्याप्रमाणे अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे की ज्या मागण्या राज्यातर्फे करण्यात आलेल्या होत्या त्या पूर्ण झाल्याच नाहीयेत.

आपली प्रतिक्रिया द्या