डोंबिवलीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक लोकल एकामागोमाग एक थांबल्या असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी लोकल धावत असतानाच डोंबिवलीजवळ ओव्हरहेड वायर तुटली. ओव्हरहेड वायर तुटल्याने मोठ्या स्फोटासारखा आवाज झाला. त्यामुळे लोकल जागीच थांबली. यामुळे प्रवाशांनी प्रचंड पळापळ सुरू झाली. प्रवाशांनी लोकलमधून बाहेर उड्या घेतल्या आणि वाट दिसेल तिकडे धाव घेतली.
View this post on Instagram