‘मरे’ची घसरगुंडी रोखण्यासाठी २४.७ किलोमीटरचे ट्रॅक बदलणार

27

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या लोकलची वारंवार होणारी घसरगुंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंतचे रूळ बदलण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरूनच लांब पल्ल्याच्या गाड्यांची तसेच मालगाड्यांची वाहतूक होत असल्याने हे रूळ संपूर्णपणे झिजले असून ते बदलण्याशिवाय आता पर्यायच नसल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने गेल्याच आठवड्यात ठाणे-वाशी आणि ठाणे – मुलुंड मार्गावरील ३ किमीचे ट्रक ब्लॉक घेऊन बदलले होते. अशा कामासाठी ३०० मजुरांचा वापर करण्यात आला. कुर्ला ते सीएसएमटी मार्गावरील ट्रक बदलण्याचे काम सुरू आहे. या मोहिमेत आतापर्यंत नऊ किलोमीटरचा ट्रक बदलण्यात आला असून आणखी नऊ किमीचा ट्रक बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कल्याण रेल्वेच्या यार्डातील रूळही संपूर्णपणे बदलण्याची मोहीम सुरू आहे.

१९ डिसेंबरपर्यंत महिनाभरात हे ट्रक बदलण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेचे ट्रक कचऱ्यामुळे गंजत असून त्यांचे आयुर्मान कमी होत आहे. या मार्गावरून तब्बल १६० टन वजनाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची इंजिने, मालगाड्या, लोकल धावत असतात. त्यामुळे रुळांची प्रचंड झीज होत असते असे सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या