धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

30

सामना ऑनलाईन, मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत व्हायला विशेष कारण लागत नाही. थेंबभर पाऊस असो, वायर तुटणे असो किंवा ट्रॅकला तडे जाणे अशी असंख्य कारणं आहेत ज्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक एकतर विस्कळीत होते किंवा पूर्णपणे ठप्प होते. त्यात आता भर पडलीय ती धुक्याची.कर्जत ते ठाण्यादरम्यान आज धुक्याची मऊशार दुलई पसरल्याचं चित्र बघायला मिळत होतं. या दृश्याने प्रवासी सुखावले होते, मात्र याच कारणामुळे रेल्वेची वाहतूक जवळपास अर्धा तास उशिराने होत असल्याने लोकल सेवेला शिव्या देत होते. सकाळी ७ च्या सुमारास अनेक लोकल उशिराने धावत होत्या असं प्रवाशांनी कळवलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या