मध्य रेल्वेने बांगलादेशात एक लाख टन कांदा निर्यात केला!

602

मध्य रेल्वेने लॉकडाऊनमध्येही असलेल्या लासलगावच्या नाशिक तसेच मनमाड तसेच कोपरगावच्या शेतकर्‍यांनी पिकविलेल्या कांद्याची थेट बांगलादेशात निर्यात करण्यास मदत केली आहे. गेल्या तीन महिन्यांत 55 मालगाड्यांमधून जवळपास एक लाख टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी, अडत व्यापारी आणि लोडर्स अशा सार्‍यांच्या चेहर्‍यावर हसू फुलले आहे.

मध्य रेल्वेला परराष्ट्र मंत्रालयातून आपला शेजारी बांगलादेशाला जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्यासंदर्भात सूचना करण्यात आली होती. त्यात कांदा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे मे, जून आणि 10 जुलैपर्यंत तब्बल 55 मालगाड्यांद्वारे आतापर्यंत 1 लाख टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. हा कांदा मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हीजनच्या नाशिक, लासलगाव, निफाड आणि मनमाड या रेल्वे स्थानकांतून तसेच सोलापूर डिव्हीजनच्या कोपरगाव, येवले स्थानकातून मालगाड्यांतून बांगलादेशला निर्यात करण्यात आला.

मध्य रेल्वेचे अधिकारी यासंदर्भात लोडरशी व्हिडीओ कॉन्सरिंन्सगद्वारे संपर्क ठेवून सूचना देत होते. एकट्या मे महिन्यात 27 मालगाड्यांद्वारे कांदा निर्यात झाला. तसेच जूनमध्ये २३ मालगाड्यांनी कांदा पोहचविण्यात आला. 10 जुलैपर्यंत पाच मालगाड्यांनी कांदा बांगलादेशसाठी रवाना करण्यात आला. हे करताना केंद्र आणि राज्य सरकारच्या लॉकडाऊन आणि ‘सोशल डिस्टिंन्सग’ संदर्भातील सर्व नियमांची अंमलबजावणी केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

कांद्याची लागवड करणारे चांदवड, नाशिक येथील प्रकाश बिकाजी सोनवणे यांनी सांगितले की, कांद्याची निर्यात केल्याने आपल्याला चांगले पैसे मिळू शकले आणि रेल्वेने वॅगन उपलब्ध केल्याबद्दल रेल्वेचे आभार मानावे तिकके थोडे असल्याचे ते म्हणाले. तर धुगाव, चांदवडचे संतोष जाधव यांनी सांगितले की, ‘लॉकडाऊन असूनही रेल्वेच्या मालवाहतूकीमुळे या भागातील आम्ही सर्व शेतक-यांना कांद्याला चांगला भाव मिळून आम्हाला मोलाची मदत झाली.

आपली प्रतिक्रिया द्या