मध्य रेल्वेने विनामास्क प्रवाशांकडून 77 हजार रुपयांचा दंड वसूल केला

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईत कडक निर्बंध लागू झाले असल्याने लोकल ट्रेनमध्ये प्रवेशबंदी घातली आहे.  17 ते 30 एप्रिलदरम्यान मास्क न घातलेल्या 446 प्रवाशांकडून मध्य रेल्वेने दंड म्हणून 77 हजार रुपये वसूल केले आहेत.

एप्रिल 2021 मध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरीय गाडय़ामध्ये विनातिकीट 42 हजार 858 जणांकडून दंड म्हणून 1.20 कोटी रुपये जमा केले आहेत.  राज्य सरकारच्या ब्रेक द चेन  नोटिफिकेशनद्वारे केवळ अत्यावश्यक वर्गातील प्रवाशांना उपनगरी गाडय़ांमध्ये प्रवास करण्याची परवानगी असल्याने इतरांनी स्टेशन वा ट्रेनमध्ये गर्दी करू नये, तसेच रेल्वे परिसर आणि ट्रेनमध्ये कोविडसंबंधित एसओपीचे  पालन करावे, असे आवाहन प्रवाशांना करण्यात येत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या