मध्य रेल्वे विस्कळीत, आसनगाव ते वासिंद रेल्वेसेवा पुन्हा ठप्प

24
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । कल्याण

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मंगळवारचा दिवस पुन्हा मन:स्तापाचा ठरणार आहे. सकाळपासून मध्य रेल्वेची आसनगाव ते वासिंद रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण-कसारा रेल्वे मार्गाला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. मुंबईकडे निघालेल्या प्रवासी आणि नोकरदारवर्गाला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

मध्य रेल्वेच्या आसनगाव-वासिंद स्थानकांदरम्यान नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस घसरून मोठा अपघात झाला होता. यानंतर तब्बल चार दिवस या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. शनिवारी हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: खुला करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा भराव खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, कामावर पोहोचणे आवश्यक असल्याने अनेक प्रवाशांनी आसनगावपासून रेल्वे मार्गावरून पायपीट करत वासिंद स्थानक गाठल्याची माहिती मिळते.

आपली प्रतिक्रिया द्या