मरे बोंबलली! सिग्नल बिघाडामुळे लोकल 15-20 उशिराने

सामना ऑनलाईन | अंबरनाथ

कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्थानका दरम्यान सिग्नल यंत्रणा बिघाल्याने मध्ये रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटे उशिराने सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लेट मार्क मुळे प्रवासी वैतागले आहेत. गेल्या आठवड्यात देखील अशीच स्थिती असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता.

आज पहाटे सहाच्या सुमारास कल्याण ठाकूर्ली दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्या. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल खोळंबल्या. त्यामुळे लोकल तब्बल 15-20 मिनिटे उशिरा धावत आहे. ऐन सोमवारी सकाळीच लोकल खोळंबा झाल्याने चाकरमान्यांची चांगलीच पंचाईत झाली.