मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, वाचा आज काय कारण!

24
local

सामना ऑनलाईन । कल्याण

मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या मागे ‘बिघाड’ त्यांची पाठ सोडण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी दुपारी १२च्या सुमारास मध्य रेल्वेच्या कल्याण-कर्जत मार्गावर बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सिग्नल यंत्रणेतील बिगाड दुरुस्त करण्यास कितीवेळ लागेल हे निश्चित सांगण्यात आलेले नाही. या प्रकारामुळे अंबरनाथ-उल्हासनगर-विठ्ठलवाडी येथे लोकल खोळंबल्या असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या