मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड, रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक धीम्या गतीनं

38

सामना ऑनलाईन । मुंबई

जरा पावसाने लहान मुलं आजारी पडात, तशीच मध्य रेल्वेची अवस्था असून तांत्रिक बिघाड, सिग्नल यंत्रणा बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे असे प्रकार वाढतात. मंगळवारी सकाळी देखील तांत्रिक बिघाडामुळे कुर्ला रेल्वे स्थानकात सीएसटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकल गाड्या अडकून पडल्या. तसेच शीव (सायन) स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून चाकरमानी प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे.

सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे आज सकाळी ६:०० च्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकात अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे धीम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली. रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने चाकरमानी मात्र हैराण झाले आहेत.

दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे सुरू केले असून लवकरच अप-धीम्या मार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या