मध्य रेल्वे कोलमडली, प्रवाशांचे हाल

सामना ऑनलाईन । दिवा

मध्य रेल्वेवर दिवा आणि कोपर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची कल्याणकडे जाणारी वाहतूक अर्धा तास उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. कामावरुन परतत असलेले अनेक नागरिक अद्याप घर गाठू शकले नाही.

दिवा-कोपर स्थानकांदरम्यानचा तांत्रिक बिघाड दूर झाल्याचा दावा रेल्वेने केला असला तरी कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे. धीम्या मार्गावरील अनेक लोकल रखडल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या