लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

8
dombivli

सामना ऑनलाईन । डोंबिवली

मध्य रेल्वेवरील वाढत्या गर्दीचा आणखी एक बळी सोमवारी गेला असून कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. सविता नाईक (वय 30) असं मृत महिलेचं नाव आहे.

सविता या डोंबिवली पूर्वेकडील सांगरली येथे वास्तव्यास असून सोमवारी सकाळी डोंबिवलीहून सुटलेल्या सीएसएमटी फास्ट लोकलमधून त्या पडल्या. घटना घडल्यानंतर डोंबिवली जीआरपीची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी मृतदेह डोंबिवलीत आणला.