प्रतिरुग्ण दीड लाख रुपये निधी येत असल्याची अफवा, चंद्रपूर महापालिकेकडून खंडण

1459

चंद्रपूर महापालिकेला कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी प्रतिरुग्ण दीड लाख रुपयांचा निधी येत आहे, त्यामुळे रुग्णांची संख्या मुद्दाम अधिक दाखवली जाते, अशी अफवा चंद्रपुरात पसरली आहे. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या ही निधी मिळवण्यासाठी केलेला खटाटोप असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांत सुरू आहे. अशा चर्चांवरून नागरिक कोरोनाकडे वेगळ्याच नजरेनं बघू लागले. शहरभर ही चर्चा सुरू होतील. याबाबत पालिकेशी संपर्क साधला असता त्यांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रतिरुग्ण दीड लाख रुपयांचा निधी महापालिकेला येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी खनिज विकास निधीतून दोन कोटी 33 लाख रुपये महापालिकेला उपलब्ध करून दिले असून, त्यातून व्यवस्थेवरील खर्च भागवला जात आहे. त्यामुळं अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि आजाराची काही लक्षणं दिसल्यास तातडीनं समोर येऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेनं केलं.

आपली प्रतिक्रिया द्या