छगन भुजबळ पुन्हा जेलमध्ये

30

सामना ऑनलाईन। मुंबई

लाईक करा, ट्विट करा

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ पुन्हा जेलमध्ये पोहोचलं आहेत. रात्री ९ वाजता त्यांना अँम्ब्युलन्सने आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आलं. बुधवारी भुजबळांना एकामागोमाग दोन जबरदस्त असे धक्के बसले. कोर्टाने भुजबळांनी अटकेविरोधात केलेली याचिका आणि जामीनासाठी केलेले अर्ज निकाली काढत त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. म्हणजेच कोर्टाने त्यांची अटक योग्य ठरवली आणि त्यांना जामीनही नाकारला

ambulance-for-new-site

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती शालीनी फणसळकर-जोशी यांच्या खंडपीठाने भुजबळ यांचा अर्ज फेटाळल्याने तुरुंगातून बाहेर येण्याचे भुजबळ यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.छगन भुजबळ यांना बेहिशाबो मालमत्ता जमा केल्याप्रकरणी आणि आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे अटक करण्यात आली होती. भुजबळ यांनी तब्येतीचं कारण देत जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र मुंबई हायकोर्टाने त्यांचा ही याचिका फेटाळून लावली. भुजबळविरोधात ज्या कोर्टात खटला सुरू आहे त्या कोर्टात जामीनासाठी अर्ज न करता थेट हायकोर्टात जामीनासाठी याचिका केली होती. या प्रकरणाचा सविस्तर निकाल नंतर देण्यात येईल, असे खंडपीठाने बुधवारी जाहीर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या