YouTube वर अल्पावधीत श्रोत्यांच्या पसंतीस उतरलेले Bado Badi हे चाहत फतेह अली खान यांच गाणं युट्यूबने अचानक काढून टाकले आहे. Instagram सहीत सर्व सोशल मीडिया माध्यमांवर या गाण्याची चर्चा होती. मिलीयन्समध्ये या गाण्याला व्यू मिळाले होते. मात्र अचानक हे गाणं हटवल्यामुळे श्रोते सुद्धा संभ्रमात पडले होते.
Chahat Fateh Ali Khan यांनी एप्रिल 2024 मध्ये बदो बदी हे गाणं युट्यूबर अपलोड केले होते. अल्पावधीत हे गाणं लोकप्रिय झाल आणि या गाण्याला 25 मीलियन्सपेक्षा अधिक व्यू मिळाले होते. इन्स्टाग्राम रिल्स आणि युट्यूब शॉर्ट्सवर या गाण्याची जोरदार चर्चा होती. मात्र या गाण्याला आता युट्यूबवरून हटवण्यात आले आहे. तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल अचानक युट्यूबने हे गाण का हटवले? मिळालेल्या माहितीनुसार चाहत फतेह अली खान यांचे बदो बदी हे गाणं कॉपीराइटची समस्या निर्माण झाल्यामुळे काढून टाकण्यात आले आहे. कारण हे गाणं 1973 मध्ये आलेल्या मूव्ह बनारसी ठग या चित्रपटासाठी नूरजहाँ यांनी गायल होतं. दोन्ही गाण्यांचे बोल सारखे असल्यामुळे चाहत फतेह अली खान यांचे गाणे युट्यूबने काढून टाकले आहे.