सुवर्णपदक विजेत्या खेळाडूच्या आईवर सोनसाखळी चोरांचा हल्ला

सामना ऑनलाईन । जलपैगुडी

जकार्तामध्ये झालेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हेप्टाथलॉनमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या स्वप्ना बर्मन हिच्या आईवर सोनसाखळी चोरांनी हल्ला करत तिच्या आईच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेली आहे. या प्रकरणी स्वप्नाची आई बसाना बर्मन यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

Asian Games 2018 : हेप्टाथलॉनमध्ये स्वप्नाचा विक्रम, हिंदुस्थानला 11 वे सुवर्ण

पश्चिम बंगालमधील जलपैगुडी येथे एका गावात राहणाऱ्या स्वप्नाची आई ही शुक्रवारी साडे सातच्या सुमारास त्याच्या एका नातेवाईकासोबत बाजारात औषध आणण्यासाठी बाईकवरून जात होत्या. त्यावेळी दोन बाईकवरून आलेल्या चार सोनसाखळी चोरांनी त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचली. या झटक्यात बसाना गाडीवरून खाली पडल्या. त्यानंतर काही कळायच्या आता चोरटे चैन घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी पोलिस सध्या तपास करत असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

SUMMARY : Chain snatchers attack Asiad golden girl’s mom in West BengaL