सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्राध्यापिकेची सोनसाखळी पळवली

सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या प्राध्यापिकेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरील आलेल्या दोघा युवकांनी हिसकावून पळून गेले. ही घटना 31 मे ला सकाळी साडेसातच्या सुमारास पाखरसांगवी रस्त्यावरील गंगानगर भागात घडली.

सकाळी प्राध्यापिका पंचशिला डावकर ह्या मॉर्निंग वॉक करीता बाहेर पडल्या होत्या. दुचाकीवरून आलेल्या युवकांनी त्यांच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून नेली. खासदार सुधाकर शृंगारे यांचे निवासस्थान या भागात आहे. पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरूवात केली आहे.