चॅम्पियन्स लीग फुटबॉल, सनसनाटी विजयासह मँचेस्टर सिटी उपांत्यपूर्व फेरीत

305

मँचेस्टर सिटी संघाने शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत बलाढय़ रियाल माद्रिदला 2-1 अशा फरकाने हरवले. याप्रसंगी मँचेस्टर सिटी संघाने एकूण 4-2 अशा गोल फरकाच्या जोरावर रियाल माद्रिदचा चॅम्पियन्स लीग या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील खेळ खल्लास केला. मँचेस्टर सिटीकडून रहीम स्टार्लिंग व गॅब्रियल जेसस यांनी दमदार गोल करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. तसेच रियाल माद्रिदकडून करीम बेन्जेमा याने एकमेव गोल केला. आता अंतिम आठ म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत त्यांच्यासमोर लेयॉनचे आव्हान असणार आहे. लेयॉन संघाने ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या युवेण्टस् संघाला ‘अवेगोल’च्या आधारावर पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

झिदानने केले प्रतिस्पर्ध्यांचे कौतुक
फ्रान्सचा महान फुटबॉलपटू झिनेदीन झिदान रियाल माद्रिद संघाचा मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. याआधी चॅम्पियन्स लीगमधील बाद फेरीत त्याला केव्हाही हार सहन करावी लागली नव्हती. या कालावधीत त्यांनी तीन वेळा चॅम्पियन्स लीग स्पर्धाही जिंकली होती. या लढतीत आम्ही चांगल्या संघाकडून पराभूत झालो असे झिनेदीन झिदान म्हणाला.

रोनाल्डोची मेहनत वाया
दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या दमदार कामगिरीच्या जोरावर युवेण्टस् संघाने इटलीतील सीरी ए स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवली. चॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठीही त्यांनी पाऊल टाकले. पण लेयॉन संघाकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला अन् आव्हान संपुष्टात आले. परतीच्या लढतीत युवेण्टस् संघाने लेयॉन संघाला 2-1 असे पराभूत केले.

आपली प्रतिक्रिया द्या