चंद्राबाबू नायडूंना धक्का, भ्रष्टाचाराप्रकरणी होऊ शकते अटक

5

सामना ऑनलाईन । अमरावती

चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या भ्रष्टाचारासाठी त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास देखील होऊ शकतो, असे भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना त्यांच्याविरोधातील सर्व पुरावे केंद्र सरकारला देण्याचे आवाहन देखील केले आहे.

‘केंद्र सरकारने आंध्र प्रदेशच्या जनतेसाठी दिलेला पैसा लोकांपर्यंत पोहचलाच नाही. तो पैसा कुठे गेला. तो पैसा परत मिळवायला हवा. हा चोरीचा प्रकार जनतेच्या व केंद्र सरकारच्या समोर आणायला हवा. या चोरीच्या सर्व फाईल्स सीबीआयकडे व ईडीकडे चौकशीसाठी पाठवायला हव्या’, असे देवधर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

जगन मोहन रेड्डी सत्तेवर आल्यापासून त्यांनी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा अलिशान ‘प्रजा वेदिका’ हा बंगला जमिनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. नायडू यांनी मियम धाब्यावर बसवत बेकायदेशीररित्या हा बंगला बांधल्याने तो तोडण्यात आल्याचे समजते.