पत्रकारांना ऑफर, एक दिवसासाठी भाजपचे नेते होऊन बघा!

11
chandrakant-patil

सामना प्रतिनिधी । कणकवली

‘एका दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, म्हणजे कशी कसरत करावी लागते हे तुम्हाला समजेल’ अशी ऑफरच आज सार्वजनिक बांधकाममंत्री भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांच्या पाहणी दौऱयाचा दुसरा राऊंड पाटील यांनी घेतला त्यावेळी येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पेट्रोल-डिझेल दरवाढ, भाजप मंत्री आणि आमदार – खासदारांची बेजबाबदार विधाने यामुळे भाजप सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. विरोधक आणि प्रसारमाध्यमांना तोंड देताना भाजप नेते हैराण झाले आहेत.

पाटील हेसुद्धा हैराण असून ते म्हणाले, युतीमधील मित्रपक्षांसोबत कसरत करत चार वर्षे सत्तेत आहोत. शिवसेना, जानकर, आरपीआय, खोत, शेट्टी या सर्वांचा समतोल साधत कसे पुढे जावे लागते हे समजण्यासाठी तुम्ही एक दिवसाचे भाजप नेते व्हा, असे पाटील पत्रकारांना म्हणाले. निवडणुकीत पुन्हा महायुती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या