पवार कुटुंबातील चांगली व्यक्ती भाजपमध्ये आल्यास त्याचे स्वागत! चंद्रकांत पाटील

344

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण तापायला लागले आहे. या तापलेल्या वातावरणामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. त्यांची एका इंग्रजी दैनिकाने सविस्तर मुलाखत घेतली असून यामध्ये त्यांना पवार कुटुंबातील व्यक्ती भाजपमध्ये आल्यास त्याचे स्वागत करणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. चंद्रकांत पाटील हे भाजपकडून पुण्यातील कोथरूड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

राज्यात पंतप्रधान मोदींच्या 9, शहांच्या 18 सभा होणार! – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पाठवलेल्या नोटिशीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या समन्सनंतर पवारांनी माझ्याविरोधात नेमका गुन्हा काय ? असा प्रश्न विचारत स्वत:हून ईडी कार्यालयात जाण्याचे ठरवले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले होते. मुंबई आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी पवारांची भेट घेऊन ईडी कार्यालयात जाऊ नये अशी विनंती केली होती. ही विनंती मान्य करत पवारांनी आपला निर्णय मागे घेतला होता. या प्रकरणाबाबत चंद्रकांत पाटील यांनी त्यांची सविस्तर भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की या प्रकरणामुळे भाजपची त्रेधातिरपीट उडाल्याच्या बातम्या निराधार आहेत. सरकारचा ईडीच्या कारभारामध्ये अजिबात हस्तक्षेप नसून ईडीने पाठवलेली नोटीस ही तक्रारदाराने शरद पवारांचे नाव घेतल्याने आणि न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या प्रकरणामुळे पवारांना सहानूभूती मिळणार नाही असंही ते म्हणाले.

राज्यात पंतप्रधान मोदींच्या 9, शहांच्या 18 सभा होणार! – चंद्रकांत पाटील

भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्या नेत्यांबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांनाच पक्षात स्थान मिळावे या संघाच्या भूमिकेशी भाजप विसंगत पद्धतीने वागत असल्याचे पाटील यांना विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तरे देत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले की पक्षात कोणत्या नेत्यांना घ्यायचे याचा पूर्ण विचार करूनच त्यांना घेण्यात आले आहे. इतर पक्षातून आलेल्या नेतेमंडळी पक्षाच्या धोरणांवर अजिबात प्रभाव पाडू शकणार नाहीत असे पाटील म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अत्यंत गंभीर आरोप असलेली अनेक मंडळी भाजपमध्ये येण्यास इच्छुक होती, मात्र त्यांना नकार देण्यात आला असं पाटील यांनी सांगितले. हे नेते कोण आहेत, त्यांची नावे सांगण्यास पाटील यांनी नकार दिला.

काँग्रेस-राष्ट्रवादी नाही, शिंदे स्वतः थकलेत ; अजित पवारांचा टोला

 

भाजपमधील दिग्गजांचे तिकीट कापून त्याऐवजी दुसऱ्यांना संधी देण्यात आल्याबद्दलही पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. या नेते किंवा मंत्र्यांची कामगिरी खराब असल्याने त्यांचे तिकीट कापण्यात आल्याची चर्चा आहे. यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की हा दावा खोटा आहे. विनोद तावडे यांचे उदाहरण देताना ते म्हणाले की त्यांनी उत्तम कामगिरी केली होती, आणि चांगले निर्णयही घेतले होते. मात्र तरीही वरिष्ठांनी त्यांना तिकीट दिले नाही. तिकीट न दिलेल्या नेत्यांना इतर महत्त्वाची जबाबदारी देण्याचं पक्षाने ठरवलं असावं आणि म्हणूनच हा निर्णय घेतला असावं असं पाटील यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे यांना तिकीट का देण्यात आले नाही असं विचारलं असता त्याबद्दल आपल्याला माहिती नसून हा प्रश्न अमित शहा यांना विचारायला हवं असं त्यांनी उत्तर दिलं.

इतर पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की भविष्यात पवार कुटुंबातील व्यक्ती जरी भाजपमध्ये आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. जर या कुटुंबातील कोणी व्यक्त भाजपमध्ये आली तर त्याचे स्वागत होणार का असा प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले की त्याच्या क्षमतेनुसार याबाबतचा निर्णय घेतला जाईल. जर ती व्यक्ती चांगली असेल तर त्याचे स्वागत का नाही करायचे असं पाटील यांनी म्हटले आहे. मात्र ही घडामोड विधानसभा निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता अत्यंत कमी असून भविष्यात आमचा विजय झाला की हे नक्की होईल असेही त्यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या