चंद्रकांत पाटलांची समन्वयक मंत्रीपदावरून हकालपट्टी करा!

16

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कर्नाटक सरकारचे कानडी गुणगाण करत सीमाभागातील मराठी भाषिक आणि हुतात्म्यांचा अवमान करणारे महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा सीमाभाग समन्वयकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आज संतप्त सीमाबांधवांकडून काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांची सीमाभाग समन्वयकमंत्री पदावरून हकालपट्टी करण्याच्या मागणीसह त्यांच्या धिक्काराच्या घोषणांनी परिसर दणाणुन गेला होता.

शुक्रवारी सायंकाळी गोकाक येथील तवग गावांत दुर्गा मंदिराच्या वास्तू कार्यक्रमासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी चक्क ‘जन्म घ्यावा तर कर्नाटकातच’ असे कानडी गीत आळवले होते. कन्नडीगांना खूश करण्याच्या नादात त्यांनी मराठी भाषिकांचा अवमान केला. सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री आहेत या जबाबदारीचे त्यांना भानही नसल्याने चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सीमाभागातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संतप्त सीमाबांधवांनी अखेर गल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनीही बळाचा वापर करून सर्वांना पोलीस वाहनात घातले.

आपली प्रतिक्रिया द्या