मनावर दगड ठेवून शिंदे यांना मुख्यमंत्री केले!चंद्रकांत पाटील यांनीच बिंग फोडले

राज्यातील सरकार पडल्यानंतर सत्ता स्थापनेच्या वेळी केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला आणि मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दुŠख झाले. पण आपण दुŠख पचवून पुढे गेलो, असे सांगत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे कोण होते याचे बिंग सर्वांसमक्ष फोडले. सरकार पडल्यावर मनासारखे झाले नाही. यामुळे राज्यातील भाजप नेते कसे सुतकात आहेत याची कबुलीही त्यांनी दिली.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पनवेलमधील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आल. त्यावर बोलताना चंद्रकात पाटील यांनी शिंदे मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांच्या आणि इतर भाजप नेत्यांच्या मनात असणारी खदखदच बोलून दाखवली. चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात सत्ताबदल झाला. तो बदल होत असताना योग्य संदेश देईल अशा व्यक्तीची गरज होती. असं असतानाही केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. फडणवीस यांनी हा निर्णय मान्य केला. काही जण तर रडले, आपल्याला दुŠख झाले. पण आपण दुŠख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला पुढे जायचे होते, असं पाटील म्हणाले.

फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री राहील्यावर शिंदे यांना सीएम करतील असं वाटले नव्हते

राज्यात वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे राहिलेले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. ते पाच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यानंतरही एकनाथ शिंदे यांना सीएम करतील असे कोणालाही वाटले नव्हते, पण पेंद्रीय नेतृत्वाने निर्णय दिला आणि तो देवेंद्र फडणवीस यांनीही मानला. यासाठी आपण सर्वांनी त्यांना सॅल्यूट केला पाहिजे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले तेव्हा सभागृहातील भाजपचे सर्व प्रतिनिधी उभे राहिले आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

आशीष शेलार यांच्याकडून सारवासारव

केंद्रीय नेतृत्वाचे आदेश आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यावर भाजपचे नेते आशीष शेलार यांना पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावार्थ व्यक्त केला. ते त्यांचे मत नाही पिंवा भाजपचेही मत नाही, अशी सारवासारव करत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीतून आदेश येताच पाटील यांचे भाषण सोशल मीडियावरून हटवले

प्रदेश कार्यकारिणीत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडीओ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला. पाटील यांच्या वक्तव्याचे पडसाद थेट भाजपच्या दिल्लीतील राजकीय गोटात उमटले. या वक्तव्यामुळे शिंदे गटही नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीतून चव्रे फिरली आणि पेंद्रीय नेतृत्वाकडून आदेश येताच प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ भाजपच्या सर्व सोशल मीडिया पेजवरुन हटविण्यात आला आहे.

शिंदेंना मुख्यमंत्री करायचं आधीच ठरलं होतं

चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषणाच्या ओघात अनेक गोष्टींची कबुली दिली. शिंदे यांचे बंड अचानक नव्हते तर सर्व ठरवून घडले होते. त्यांना मुख्यमंत्री करायचे हेसुद्धा आधीच ठरले होते, असे सांगताना फडणवीस यांनी यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा होती. त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सर्व घडले, अशी कबुलीही दिली.

चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. फडणवीस यांनी हा निर्णय मान्य केला. काही जण तर रडले, आपल्याला दुŠख झाले. पण आपण दुŠख पचवून पुढे गेलो, कारण आपल्याला पुढे जायचे होते.

आशीष शेलार यांची सारवासारव

व्हिडिओ बैठकीबाहेर कसा गेला आणि भाजपच्या सोशल मीडिया पेजवरून तो कसा व्हायरल झाला याची शोधाशोध भाजपने सुरू केली आहे. दरम्यान हा पक्षांतर्गत प्रश्न आहे आणि तो आम्ही सोडवू असा खुलासा आशीष शेलार यांनी केला आहे.