युतीसाठी फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला कठीण!

1891
chandrakant-patil

शिवसेना-भाजप युतीसाठी 50-50 चा फॉम्र्युला कठीण आहे. 135-135 जागांमध्ये आमची ओढाताण होईल याची जाणीव शिवसेनेलाही आहे असे भाजप प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकारांना सांगितले. 288 जागांपैकी 18 जागा मित्रपक्षांना सोडल्यावर उर्वरित 270 जागांबाबत ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीतील जागावाटपावर गणेशोत्सवात चर्चा होईल. एकमेकांच्या सीटिंग जागांना हात लावायचा नाही असे पाटील यांनी आज सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्य्या पाश्र्वभूमीवर पत्रकारांनी युतीच्या जागावाटपाबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेना-भाजपमधील एकमेकांच्या जागांना हात लावणार नाही. पण त्याला काही अपवाद असू शकतात. त्यात प्रादेशिक समतोल राखण्याबाबत विचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले

आपली प्रतिक्रिया द्या