पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – चंद्रकांत पाटील

1703
chandrakant-patil

पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. सोलापुरातील स्थानिक पातळीवरील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. परळीतल्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याविषयीही चंद्रकांत पाटील यांनी बंड हे स्वतःच्या पक्षाविरोधात करायचं नसतं, तसचं चर्चा ही चार भिंतीच्या आत करायची असते, असं म्हटलं आहे. तसंच पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याविषयी बोलताना, परळीला गेलो नसतो कर तीव्रता आणखी वाढली असती, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

परळीतील पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी तिथे जायच्या आधी अनेक जणांनी मला सुचवलं की तिथे जाऊन काय होईल, माहीत नाही. तुम्हाला बोलू देतील की नाही? पण मी म्हटलं की जाणार आणि मी गेलो. तिथे जो संवाद झाला त्याचं चित्र आज जरी मनाला वेदना देणारं असलं तरी मी परळीला गेलो नसतो, संवाद झाला नसता तर ही तीव्रता आणखी वाढली असती. पण, मी गेलो, संवाद झाला त्यामुळे खूप गोष्टी सौम्य झाल्या, असं चंद्रकांत पाटील सोलापुरात म्हणाले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, पंकजांनी परळीतल्या भाषणात असं म्हटलं की, बंड केलं म्हणून न्याय मिळाला. शिवाजी महाराजांनीही बंड केलं. पण कुणाविरुद्ध केलं? मोगलांविरुद्ध केलं. असं म्हणताना पाटील म्हणाले, की बंड आपल्या लोकांविरुद्ध करायचं नसतं, चर्चा ही आपल्या लोकांशी करायची असते. ही चर्चा चार भिंतींच्या आत करायची असते, असं पाटील यावेळी म्हणाले.

पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, अशा सज्जड इशारा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत पक्षाचं वातावरण आता खूप कडक झालं आहे. तेव्हा जर काही अडचणी असतील तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही बोलून मार्ग काढू. पण, पक्षविरोधी कारवाया चालणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आपली प्रतिक्रिया द्या