चंद्रकांत वाईरकर यांचे निधन

सामना प्रतिनिधी । मुंबई

जुन्या काळातील शिवसैनिक चंद्रकांत लक्ष्मण वाईरकर ऊर्फ चंदू मास्तर यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने केईएम रुग्णालयात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

दोनच दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला म्हणून त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांच्यावर उपचार करून त्यांना लगेचच घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर रविवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा पुन्हा तीव्र झटका आल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. सामाजिक कार्यात चंदू मास्तर यांचा नेहमीच सक्रिय सहभाग होता. दरम्यान, संध्याकाळी भोईवाडा स्मशानभूमीत मास्तरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.