चंद्रपूर: संतोष रावत गोळीबार प्रकरणात, दोन आरोपींना अटक

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजगीर यादव (36), अमर यादव (29) अशी आरोपींची नावे असून हे दोघेही सख्खे भाऊ आहेत.

वेकोलीत नोकरी मिळविण्यासाठी रावत यांना आरोपींनी 6 लाख रुपये दिले होते. ते पैसे परत करत नसल्यामुळे रागाच्या भरात रावत यांना जीवे मारण्याचा आरोपीनी प्रयत्न केला. अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. आरोपी राजवीर यादव हा काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. त्यामुळे गोळीबार प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगल्या होत्या. दरम्यान आरोपीची नार्को टेस्ट करून त्यांचा सूत्रधार नक्की कोण आहे त्याचा शोध घेत मुख्य आरोपीला अटक करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.