
चंद्रपुरातील एका दोन मजली इमारतीत 25 फूट खड्डा पडल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या वेळेस घडली, घरात काम करत असलेली महिला अचानक पडलेल्या त्या गड्ड्यात पडून जखमी झाली आहे. चंद्रपूर शहरातील रयतवारीतील आमटे लेआउट परिसरात घटना घडली असून सुरेश शिवणकर असे घर मालकाचे नाव आहे. जखमी महिलेचं नाव संगीता शिवणकर आहे. जखमी संगीता शिवणकर यांना जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.