चोरी केली पण पैशाची नाही, मन हेलावून टाकणारी घटना सीसीटीव्हीत कैद

8551
cctv

कोरोना संकटाने गोरगरिबांचे खाण्याचे कसे हाल केले आहेत, याचा प्रत्यय आणून देणारी एक घटना चंद्रपुरात घडली. पैशाचे बंडल हाती लागले असतानाही चोराने ते जसेच्या तसे ठेवले आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन निघून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि गरिबांच्या भुकेचा आणि प्रामाणिकतेचाही प्रत्यय आला. चंद्रपूर – नागपूर महामार्गावर हॉटेल सचिन आहे. लोकवस्तीपासून थोडे दूर आहे, पण अगदी हायवेवर आहे. याच हॉटेलमध्ये घडलेली ही घटना आहे.


View this post on Instagram

चोरी केली पण पैशाची नाही, घटना CCTV मध्ये कैद

A post shared by Dainik Saamana (@saamanaonline) on

चंद्रपुरात 10 तारखेपासून जनता कर्फ्यु लागू करण्यात आला. त्यामुळं जनजीवन ठप्प झालं होते. दुकानं, हॉटेल्स, रोजगार सारे काही बंद होते. हातावर आणून पानावर खाणाऱ्या लोकांची यामुळे मोठी अडचण झाली. रोजगार नाही, त्यामुळे पैसे नाहीत. मग खायचे काय, असा प्रश्न एका युवकाला पडला आणि शेवटचा उपाय म्हणून त्याने अन्नाची चोरी करण्याचे ठरवले. 10 सप्टेंबरच्या रात्री हा युवक हॉटल सचिनमध्ये घुसला. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेल्या या चोराने आधी फ्रिजमधून पाण्याची बॉटल काढली आणि मनसोक्त पाणी प्यायला. ती बॉटल परत फ्रीजमध्ये ठेवली. त्यानंतर त्याने खाद्य पदार्थाकडे मोर्चा वळवला. हाती जे लागेल ते त्याने आरामात खाल्ले, काही खिशात भरले. नंतर मालकाच्या खुर्चीवर जाऊन बसला. टेबलाचे रकाने उघडून बघितले. त्यात त्याला मोठी रक्कम दिसली. मात्र ही रक्कम त्याने जशीच्यातशी ठेवली आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी हॉटेल मालकाने हे फुटेज बघितले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यांनी लगेच पैसे तपासले, ते तसेच ठेवलेले दिसले. केवळ भुकेपोटी या युवकाने हे कृत्य केले, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलीस तक्रारही केली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या