
चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरातील पार्किंगमध्ये मद्यधुंद अवस्थेत पडलेल्या तरुणाला एकामागोमाग दोन वाहनांनी चिरडले. यातच त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
उमंग नीलकंठ दहिवले असे मृत तरुणाचे नाव असून तो देवडा गावातील महाकाली नगरीतील रहिवाशी आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे घटना स्थळी पोहचल. या प्रकरणी तपास करताना पोलिसांनी अपघात स्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले असता तरुणाच्या शरीरावरून एकामागोमाग एक अशी दोन चारचाकी वाहने गेल्याचे आढळून आले.
भयंकर! मद्यधुंद तरुणाला एकामागोमाग दोन वाहनांनी चिरडले, चंद्रपुरातील अपघात सीसीटीव्हीत कैद #accident pic.twitter.com/b24Fw3CtNL
— Saamana (@SaamanaOnline) February 7, 2023
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. प्रतीक बालाजी वाभीटकर आणि जितेश गोपाल विरानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही चारचाकी वाहने शहर पोलिसांनी जप्त केली आहेत.