चंद्रपूर – दारुबंदीचा अभ्यास करण्यासाठी 13 सदस्यीय समिती जाहीर

चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीसंदर्भात आलेल्या निवेदनाचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. गृह खात्याने समिती जाहीर केली आहे. या समितीमध्ये 13 सदस्यांचा समावेश करण्यात आला असून यात 8 अशासकीय तर 5 सदस्य निमंत्रित असतील.

समितीला अहवाल सादर करण्यासाठी महिनाभराचा कालावधी देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व अन्य संघटनांची मते जाणून घेऊन निष्कर्ष काढण्याची सूचना करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या