सैन्य दलाची एक तुकडी ब्रह्मपुरी येथे पोहोचणार, 30 जवानांच्या मदतीने बचाव कार्य पुढे नेणार

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात पूरस्थिती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे. सध्या वैनगंगा नदीकाठच्या 21 गावांना पुराची झळ पोचली आहे. या गावांमधील पाच हजार नागरिक महापुराने प्रभावित झाले आहेत. 3300 नागरिकांना आतापर्यंत बाहेर काढल्याची माहिती त्यांनी दिली असून  1700 लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. आज रात्री सैन्य दलाची एक तुकडी ब्रह्मपुरी येथे पोहोचणार आहे. सैन्य दलाच्या 30 जवानांच्या मदतीने बचाव कार्य पुढे नेणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या