चंद्रपूर – बुरखा घालून आलेल्या युवकाचा गोळीबार, तरुण जखमी

बुरखा घालून आलेल्या युवकाने गोळीबार करत एका युवकाला जखमी केल्याची घटना चंद्रपुरात घडली. भर दुपारी घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात बुरखाधारी युवक आला. आरोपीने तीन राउंड फायर करून पळ काढला.

या घटनेला सुरज बहुरिया हत्याकांडाची किनार असल्याचे बोलले जात आहे. जखमी युवकाच नाव आकाश अंदिवार आहे.

फरार आरोपींचे नाव मंगेश बावणे, छोटू सूर्यवंशी असे आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटना स्थळी पोहचले व जखमी युवकाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटना स्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कुलकर्णी पोहचले. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या