चंद्रपूर शहरावर धुक्याची चादर, वातावरणात गारवा

आज चंद्रपूर शहराची पहाट शुभ्र चादर ओढून झाली. चोहीकडे धुक्याने वेढलेला परिसर मन मोहून घेत होता. आकाशातून प्रकाश किरणे घेऊन येणाऱ्या सूर्यालाही धुक्याने अंधुक केले. तसं बघितलं तर चंद्रपूर आणि धुक्यांचा काहीएक संबंध नाही.

तप्त उन्हासाठी प्रसिद्ध या शहराला धुके आणि कडक थंडीची तशी सवय नाही. त्यामुळं निसर्गाचा असा अवलीयापणा बघायला मिळाल्यास शहरवासी जाम खुश होतात. मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी या दाट धुक्यांचा मनसोक्त आनंद घेतला. कोरोनाचे संकट गडद होत असतानाच निसर्गाचा हा अनोखा नजारा सुखावणारा ठरला.

आपली प्रतिक्रिया द्या