चंद्रपूर : कोविड उपचार शुल्क आकारणीवरून चर्चेला उधाण, पाहा डॉक्टर काय म्हणाले

1130
chandrapur-doctor

खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांकडून मोठं शुल्क आकारलं जात असल्याचा मुद्दा चंद्रपुरात ऐरणीवर आला आहे. शहरातील सहा खासगी रुग्णालयांना कोविड उपचार केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली. ही मान्यता देताना रुग्णांना शासनानं निश्चित केलेल्या शुल्कात उपचार द्यावे लागतील, असे निर्देश दिलेत. पण हे निर्देश झुगारून खासगी हॉस्पीटल एक ते दीड लाख रुपये मागत असून, तसे फलक रुग्णालयात लावल्याची चर्चा सर्वत्र पसरली. त्यामुळं रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांत चिंतेचं वातावरण पसरलं. एवढे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. पण यात अजिबात तथ्य नसून, प्रसारित झालेला कागद हा संमतीपत्र आहे. त्यावर शासकीय दरानेच शुल्क नमूद करण्यात आले आहेत.

‘आम्ही जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत असताना अशा निरर्थक चर्चा आमच्यावर अविश्वास दाखवणाऱ्या आहेत’, अशी खंत डॉ. नरेंद्र कोलते यांनी व्यक्त केली.

डॉ. कोलते यांनी सांगितल्यानुसार इतरही खासगी रुग्णालयात पाहणी केली असता कुठेही रेटबॉर्ड आढळला नाही. रुग्णांच्या नातेवाईकांनीही कॅमेरावर न बोलता डॉक्टरांच्या बोलण्यास दुजोरा दिला. ही नुसती उठाठेव करणाऱ्या लोकांची खोडी आहे. त्यामुळं रुग्णांनी गैरसमज करू नये, असं आवाहन या खासगी डॉक्टरांनी केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या