
परीक्षा संपली की फिरायला जायचं ठरलं, पण वाहन नव्हते. मग काय दोघांनी मिळून गाडी चोरली. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे घडला आहे. गाडी चोरणाऱ्यांपैकी एक दहावीचा, तर दुसरा बारावीचा विद्यार्थी आहे. गाडी चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला असून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहे. परीक्षा संपल्यानंतर फिरण्यासाठी गाडी हवी म्हणून दोन विद्यार्थ्यांनी शहरातील दादाभाई नौरोजी वार्डातील एका कॉलीमध्ये उभी दुचाकी चोरली. दोघांनी दुचाकीची नंबरप्लेट काढून त्यावर सिद्धू मुसेवाला याचा फोटो लावला आणि पेट्रोल टाकीवर नावही लिहिले. गाडी सुरू करण्यासाठी वेगळे बटन लावून जुगाडही केली.
View this post on Instagram
दुचाकी मालकाने याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात आरोपींचे फोटो चेहरे स्पष्ट दिसत नसले तरी पांढऱ्या चप्पल आणि उंचीच्या आधारे पोलिसांनी दोघांना पकडले. तसेच त्यांच्याकडून चोरी केलेली दुचाकीही जप्त केली.