चंद्रपूर जिल्ह्यात धिडसी गाव लसीकरणात अव्वल, 45 वर्षावरील पात्र नागरिकांचे 100 टक्के लसीकरण

चंद्रपूर जिल्ह्यातील सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून जनतेमधील भीती काहीशी कमी झाली आहे. पण लसीकरणा बाबत जनतेत गैरसमज असल्याचे दिसून आलेत. आता या करीता प्रशासनाकडून जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान लसीकरणासंदर्भात असलेल्या शंका दूर करीत धिडसी गाव लसीकरणात 100 टक्के यशस्वी ठरली आहे. गावातील 45 वर्षावरील पात्र 351 नागरिकांनी लस घेतली आहे.

यात काही फ्रंट लाईन वर्करचा समावेश आहे. धिडसी ग्राम पंचायत ही जिल्ह्यातून लसीकरणात अव्वल ठरली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या विषाणूने चांगलीच दहशत निर्माण केली होती. सगळीकडे मृत्यूचे तांडव सुरू होते. बेड,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला.

आता मागील काही दिवसांपासून दुसरी लाट ओसरली असल्याने जनतेमध्ये असलेली भीती कमी होत आहे. पण आता लसीकरणावरून जनतेत गैरसमज असल्याचे पहायला मिळत आहे. या लसी बाबत असलेल्या शंका दूर करीत धिडसी गावाने लसीकरणाचा टप्पा पार केला. हजार लोकसंख्येच्या गावात 351 पात्र नागरिकांनी लस घेतली. यात काही फ्रंट लाईन वर्कर सदस्यांचा ही समावेश आहे.

45 वर्षावरील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण झाल्याने धिडसी ग्राम पंचायत जिल्ह्यातुन अव्वल ठरली आहे. या निमित्त गावात कोरोना योध्दाचा संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओम रामावत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, सरपंच रितू हनुमंते, उपसरपंच राहुल सपाट,तलाठी विनोद खोब्रागडे, ग्रामसेविका अर्चना वरघाने, सदस्य बंडू काकडे, सिंधू निखाडे, मंगला ढोके, माया जीवतोडे सह गावकरी उपस्थित होते. येत्या काही दिवसांत आणखी पाच ग्राम पंचायत मधील नागरिकांचे लसीकरण 100 टक्के पूर्ण होणार असल्याचे संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओम रामावत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या