राज्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते मैदानात उतरले आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती दर्शविली. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसैनिकांना अधिक संख्येत ग्रामपंचायत सदस्य निवडून आणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देण्याचे आवाहन केले.
आगामी काळात सरपंच पदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा आदेशानुसार काम करा असे सांगत, शिवसेनेला तळागाळात पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक जिंकणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन शिंदे यांनी केले. यावेळी बोलताना शिंदे यांनी जिल्ह्याला दोन अंबुलन्स देणार असल्याचे सांगितलं, तसेच या जिल्ह्यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही असेही ते बोलले, ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांना दुसऱ्या सदस्या साठी प्रचार करण्याची निवडून आणण्याचे आव्हानही केलं. यावेळी पूर्व विदर्भ समनव्य प्रकाश वाघ, जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, संजय काळे, जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, किरण पांडव, युवासेना, महिला आघाडी सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.