चंद्रपुरात भर वस्तीत बिबट्या शिरला; नागरिकांची पळापळ, भुलीचं इंजेक्शन देण्याचा प्रयत्न फसला

चंद्रपूर शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या बिनबा गेट परिसरातील नागरिकांची सकाळ बिबट्याच्या डरकाळ्यांनी उजाडली. सकाळच्या सुमारास बिबट्या एका घरामध्ये शिरला. सातच्या सुमारास काही युवकांना हा बिबट्या दिसला आणि नागरिकांची एकच पळापळ सुरू झाली. त्यानंतर त्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र गुंगारा देऊन बिबट्याने पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी बिनबा गेट परिसरातील दादा बोकडे यांच्या घरामध्ये बिबट्या घुसला. काही युवकांनी त्याला पाहिले आणि वन विभागाला माहिती दिली. वन विभागाच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेत त्याला पकडण्याची तयारी सुरू केली.

वन विभागाने सापळा रचत बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. रस्त्यावरच हे घर असल्याने बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती. त्याने बिबट्याने घरातून धूम ठोकत झाडाझुडपाचा आसरा घेतला. तिथे त्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अद्याप यश आलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)