लहान मुलं म्हणजे देवा घरंची फुलं असतात. पण महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातून समोर आलेला घटनेचा एक व्हिडीओ हृदयाला धडकी भरवणारा आहे, जिथे कबूतर चोरल्याच्या आरोपावरून 3 निष्पाप मुलांना एका बेदम मारहाण केली , ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील आमगाव येथे राम मंदिर परिसरात काही कबुतरे आहेत, मात्र काही दिवसांपासून येथील कबुतरे एकामागून एक चोरली जात होती, या संशयावरून येथील एका युवकाने गावातील तीन निष्पाप मुलांना बोलवून विचारपुस केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
हा व्हिडीओ व्हायरल झाला त्यामध्ये तरुणाच्या तावडीतून मुलांना सोडवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही, असं स्पष्ट दिसत आहे.