चंद्रपुरात बाप-लेकीचे प्राण वाचवण्यासाठी पोलिसाची 40 फूट खोल विहिरीत उडी

1231

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपुर गावात रात्री साडेआठ वाजता घराजवळील सार्वजनिक विहिरीजवळ खेळत असताना एक लहान मुलगी व तिचे वडील दोघेही विहीरीत पडले. घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने क्षणाचाही विचार न करत विहीरीत उडी घेत बाप लेकीचे प्राण वाचवले.

वडील प्रभाकर बारेकर व त्यांची अडीच वर्षाची मुलगी शिवण्या हे दोघे विहिरीच्या काठावर खेळत होते. त्याचवेळी अचानक मुलीचा तोल जाऊन मुलगी विहिरीत पडली, तिला वाचविण्यासाठी प्रभाकर यांना पोहता येत नसतानाही त्यांनी विहिरीत उडी घेतली. दोघे जण विहिरीत पडल्याची माहिती मिळताच पोलीस सहायक निरीक्षक व पोलीस जांभळे व शिपाई परमेश्वर नागरगोजे हे तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर नागरगोजे यांनी 40 फूट विहिरीत उडी मारून बाप लेकीला सुखरूप बाहेर काढल आणि त्यांचा प्राण वाचविला. त्या दोघांनाही शंकरपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आलं, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून जराही वेळ वाया न जाऊ देता त्या बाप लेकीचं प्राण वाचविण्यात यश आले, पोलिसांनी केलेल्या या धाडसामुळे परिसरात कौतुका चे वर्षाव होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या