चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा सात दिवसांचा ‘जनता कर्फ्यु’

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात सात दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठकीनंतर ही घोषणा केली.

जिल्ह्यात 7800 वर रुग्णांची संख्या गेली असून, त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने जनता कर्फ्यु महत्त्वाचा आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. या महिन्यात हा दुसरा जनता कर्फ्यु आहे. यापूर्वी 10 ते 13 सप्टेंबरदरम्यान चार दिवसांचा कर्फ्यु घोषित करण्यात आला होता. या कर्फ्युदरम्यान केवळ औषध दुकाने तेवढी सुरू राहणार असून, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवायची की नाही, याची रुपरेषा आखली जात आहे. या कर्फ्युला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या