छत्रपती शिवरायांशी मोदींची तुलना करणाऱ्या गोयल यांचा शिवसेनेकडून निषेध, चंद्रपुरात निदर्शने

1036

छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या जयभगवान गोयल यांच्या विरोधात चंद्रपुरात शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत.

शिवसेनेकडून हे वादग्रस्त पुस्तक लिहिणाऱ्या गोयल यांच्या निषेधाचं पोस्टर बनवून शहरातील शिवसेना कार्यालयासमोरील केवलराम चौकात आंदोलन करण्यात आलं. शिवसेनेच्या वतीने भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुस्तकावर तत्काळ बंदी आणावी, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी दिला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हेंसह राजुरा विधानसभा संपर्क प्रमुख मिथुन खोपडे, शहर प्रमुख प्रमोद पाटील, उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, नगरसेवक सागर ठाकूरवार, किरण अहिरकर, वैशाली गोरे, अनिता आत्राम, आशिष कावटवार, राहुल बेलखेडे, राहुल विरुटकर, प्रकाश पाठक, लोकेश कोटरगे, सोनू ठाकूर आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या