चंद्रपूर- शिवसेना कार्यकर्त्यांची वाढदिवसाची अनोखी भेट, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 1 लाखांची देणगी

671

जगात, देशात व राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे, कोरोना विषाणूवर नियंत्रण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अथक परिश्रम घेत असले तरी दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या तरी चंद्रपूर जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. राज्यात मुख्यमंत्री सहायता निधीत नागरिकांनी मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर नागरिक सरळ हाताने मदत करीत आहेत. चिमुकले देखील त्यांच्या पिग्गी बँकेतील पैसे मदत म्हणून निधीला देत आहे. अश्यातच शिवसेना कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या जिल्हाप्रमुख यांच्या वाढदिवसाला अनोखी भेट दिली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचा 24 एप्रिलला वाढदिवस असल्याने शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनी राज्यातील नागरिकांना संकटकाळी मदत व्हावी यासाठी कार्यकर्त्यांनी तब्बल 1 लाख 11 हजार 111 रुपये जमा करीत रकमेचा धनादेश जिल्हाप्रमुख गिर्हे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला.

कार्यकर्त्यांच नागरिकांप्रती प्रेम बघून जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचे आनंदाश्रू निघाले व सर्व कार्यकर्त्याचे अभिनंदन केले. लॉकडाउन काळात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गरजू नागरिकांना दैनंदिन भोजन, धान्य किट वाटपाचा उपक्रम सुरू केला व आजही तो सुरूच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या