Video – चंद्रपुरात आढळले 10 म्‍युकोरमायकॉसिस या बुरशीजन्‍य संसर्गाचे रुग्ण

म्‍युकोरमायकॉसिस Mucormycosis संसार्गाचे 10 रुग्ण चंद्रपूर शहरात आढल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहेत. या सर्व  रुग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लक्ष दिले जात असून, त्यांवर औषधोपचार सूरू केले आहेत. म्‍युकोरमायकॉसिस हा आजार झालेले रुग्ण चंद्रपुरात आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकिसत्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी सांगितली आहेत.

एका सिटी स्कॅन सेंटर मध्ये रुग्णांचे स्कॅन करताना हा आजार आढळून आला. मात्र, येणाऱ्या काळात या रोगाचे रुग्ण वाढण्याची शक्यताही डॉ. राठोड यांनी वर्तविली आहेत.कोराना उपचारादरम्‍यान देण्‍यात येणार्‍या स्‍टेरॉईडमुळे रूग्‍णांना अतिशय गंभीर साईड इफेक्‍टचा सामना करावा लागतो. त्यातूनच म्‍युकोरमायकॉसिस या बुरशीजन्‍य संसर्गाचे गंभीर परिणाम रूग्‍णांवर होत आहेत.

राज्‍यभरात अशा रूग्‍णांच्‍या संख्‍येत वाढ झाल्‍याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले आहेत. अशा वेळी रूग्‍णाने सतर्क राहत वेळीच निदान आणि उपचार घेणे गरजेचे आहेत. असे राठोड यांनी सांगितले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या