चंद्रपूर- वाघनख विक्रीकरिता ग्राहक शोधणारे पोलिसांच्या ताब्यात, दोन आरोपी अटक

365

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील गुरु नगर परिसरात वाघाचे नख विक्रीकरिता आणण्यात आले असून ते विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे सापळा रचून दोन आरोपी सह एक वाघ नख ताब्यात घेतले.

प्रशांत बालाजी बावणे (26, राहणार मुधोली), विकास ऋषी बावणे (22, राहणार गुरुनगर) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे शनिवारी शहरातील गुरु नगर परिसरात वाघाचे नख विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून एका वाघनखासह दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, सचिन गुरनुले, हेमराज प्रधान, केशव चिटगिरे, निकेश ढेंगे यांनी केली. हे प्रकरण वन विभागाशी संलग्न असल्याने त्या आरोपींना वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

वाघनखासह दोन आरोपींना वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ताडोबा बफर झोन येथील प्रकरणातील वाघाच्या मिशा व वाघनखासह काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते, त्यातीलच हे अन्य आरोपी असून पुढील तपास करण्यात येणार आहे.
– स्वाती म्हैसकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, भद्रावती

आपली प्रतिक्रिया द्या