वादळी वाऱ्याने मक्याचे पीक भुईसपाट, बळीराजाचे मोठे नुकसान

अभिषेक भटपल्लीवार

चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसाचा फटका मक्याच्या पिकाला बसला आहे. आज झालेल्या वादळी पावसाने मक्याचे पीक अक्षरशः जमिनीवर लोळले आहे. यात बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यातील काही भागात आज तीन वाजण्याच्या दरम्यान वादळी पाऊस झाला. या पावसाने मका पिकाचे मोठे नुकसान केले आहे. सध्या ओल्या मक्याला बाजारात मोठी मागणी आहे. मका विक्रीतून चार पैसे हातात येतील अशी आशा बळीराजाला होती. मात्र अवकाळी पावसाने त्यावर पाणी फेरले.